नवी दिल्ली : घटस्फोटीत स्त्रियांना पुरुषाने पोटगीपोटी त्याच्या मासिक उत्पन्नाच्या 25 टक्के रक्कम देणे न्याय असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
कोलकाता हायकोर्टातल्या एका घटस्फोटाच्या खटल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायायलाने हा निर्णय दिला आहे. घटस्फोटीत पुरुषाने पुन्हा एकदा अर्ज केला. त्याने आधीच्या पत्नी आणि मुलासाठी द्यावयाची मासिक पोटगी कमी व्हावी, अशी याचिका कोलकाता उच्च न्यायालयात केली. उच्च न्यायालयाने ती फेटाळली.
त्यावर पुरुषाने सर्वोच्च न्यायालयात अपील केला. या याचिकेवर सुनावणी देताना कोलकाता न्यायालयाचा निर्णय योग्यच असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे घटस्फोटीत महिलेला मोठा दिलासा मिळालाय. शिवाय हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला असल्याने तो देशातल्या सर्वच न्यायालयांमध्ये महत्वाचा संदर्भ म्हणून वापरला जाणारा आहे.