www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
राजीव गांधी यांच्या सात पैकी तीन मारेकऱ्यांना सोडण्याच्या तामिळनाडू सरकारच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. पुढील आदेश देईपर्यंत जैसे थी स्थिती ठेवण्यास सांगितले आहे. दरम्यान, तसेच हा निर्णय का घेण्यात आला याचे स्पष्टीकरणही सुप्रीम कोर्टाने तामिळनाडू सरकारकडे मागितले आहे.
राजीव गांधींच्या मारेक-यांची सुप्रीम कोर्टीनं फाशी रद्द केल्यानंतर सरकारला उशिराचं शहाणपण सूचले होते.. राजीव गांधींच्या मारेक-यांच्या सुटका करण्याचा निर्णयाविरोधात केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल केली होती. या याचिकेवर दुपारी सुनावणी होऊन तीन मारेकऱ्यांच्या सुटकेवर स्थगिती आली आहे.
तामिळनाडू सरकारनं या प्रकरणातल्या सातही आरोपींना सोडण्याचा निर्णय बुधवारी घेतला होता. या प्रकरणी मोठा गदारोळ झाल्यानंतर केंद्र सरकारनं या निर्णयाच्या विरोधात फेरविचार याचिका दाखल केलीय. सॉलिसिटर जनरल यांनी ही याचिका दाखल केली होती.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.