अमित शाह यांची सुरतमधील सभा उधळून लावली

भाजप अध्यक्ष अमित शाह यांची सभा पाटीदार समाजाचे नेते हार्दीक पटेल यांच्या समर्थकांनी उधळून लावली. गुजरातमध्ये त्यामुळे दे धक्का बसला आहे. गुजरातमध्ये भाजपचे वर्चस्व कमी होत आहे, हे यातून दिसून येत असल्याचे प्रतिक्रिया दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.

PTI | Updated: Sep 9, 2016, 10:52 AM IST
अमित शाह यांची सुरतमधील सभा उधळून लावली title=

सुरत : भाजप अध्यक्ष अमित शाह यांची सभा पाटीदार समाजाचे नेते हार्दीक पटेल यांच्या समर्थकांनी उधळून लावली. गुजरातमध्ये त्यामुळे दे धक्का बसला आहे. गुजरातमध्ये भाजपचे वर्चस्व कमी होत आहे, हे यातून दिसून येत असल्याचे प्रतिक्रिया दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.

भाजपने आपले शक्तीप्रदर्शन करण्यासाठी आणि पटेल समाजाला गोंजरण्यासाठी अध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थित बैठकीचे आयोजन केले होते. मात्र, अमित शाह यांची सभा गुरुवारी पाटीदार अनामत आंदोलन समितीने उधळली. व्यासपीठावर असलेले शहा तसेच मुख्यमंत्री विजय रुपानी व अन्य भाजप नेत्यांना ‘हार्दिक हार्दिक’ या उच्चरवातील घोषणांमुळे तसेच कार्यक्रमस्थळी मोडतोड सुरू झाल्याने काढता पाय घ्यावा लागला. 

या घटनेने भाजपला मोठा हादरा बसला असून हार्दिक समर्थकांचा जोर वाढला आहे. शहरातील पटेल समाजाच्या एका उद्योजकाने स्थापन केलेल्या ‘पाटीदार अभिवादन समिती’ या संस्थेतर्फे अमित शहा यांच्या उपस्थितीत पटेल समाजातील भाजप मंत्र्यांचा सत्कार होणार होता. २०१७मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी पटेल समाजाला जवळ करण्याकरिता हा कार्यक्रम आयोजिण्यात आला होता. मात्र, या कार्यक्रम उधळून लावण्यात आला.

सभेआधीपासूनच हार्दिक पटेल समर्थक जमू लागले आणि घोषणा देऊ लागले होते. त्यातील अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतले तरी निदर्शनांचा जोर वाढतच गेला. हार्दिक पटेल समर्थकांनी उग्र रूप धारण केल्याने एकच धावपळ उडाली. हार्दिक समर्थकांनी घोषणाबाजी करतानाच सभास्थानातील सामानाची मोडतोड केली.