माझ्या बोलण्याचा माध्यमं विपर्यास करतात- शिंदे

मी जे काही बोलतो त्याचा प्रसारमाध्यमं विपर्यास करतात असा दावा केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला आहे. पुण्यात काँग्रेस पक्षातर्फे आयोजित करण्यात आलेल्या वक्ता प्रशिक्षण शिबीरात ते बोलत होते.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Apr 28, 2013, 06:33 PM IST

www.24taas.com, पुणे
मी जे काही बोलतो त्याचा प्रसारमाध्यमं विपर्यास करतात असा दावा केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला आहे. पुण्यात काँग्रेस पक्षातर्फे आयोजित करण्यात आलेल्या वक्ता प्रशिक्षण शिबीरात ते बोलत होते.
बलात्काराप्रकरणी शिंदे यांनी संसदेत केलेल्या विधानावर देशभर गदारोळ झाला होता. मात्र माध्यमं आपली विधानं मोडून तोडून दाखवतात, असा दावा त्यांनी केलाय. बोफोर्स प्रकरण, हिंदू दहशतवाद, देशातील बलात्काराच्या घटना इत्यादी अनेक घटनांबाबत सुशीलकुमार शिंदेंची वक्तव्य वादग्रस्त ठरली होती. मात्र यामध्ये आपला दोष नसून माध्यमं जबाबदार असल्याचं शिंदेंचं म्हणणं आहे.

केंद्र सरकार स्थिर असून देशात मध्यावधी निवडणुकीची कोणतीही शक्यता नाही, असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. तसेच सरबजीत प्रकरणी भारत सरकार आणि पाकिस्तान सरकार यांच्यात बोलणी सुरु असल्याचं शिंदे यांनी यावेळी सांगितलं.