ललित मोदींसाठी कधीच शिफारस केली नाही- सुषमा स्वराज

ललित मोदी प्रकरणावरुन संसदेत आजही गदारोळ झाला. सुषमा स्वराज यांना विरोधकांनी लक्ष्य केलं. सुषमा स्वराज यांनी आपल्या निवेदनात सगळे आरोप फेटाळलेत. ललित मोदी यांना कोणत्याही प्रकारची मदत केली नसल्याचं स्पष्टीकरण स्वराज यांनी दिलं. 

Updated: Aug 3, 2015, 12:39 PM IST
ललित मोदींसाठी कधीच शिफारस केली नाही- सुषमा स्वराज title=

नवी दिल्ली: ललित मोदी प्रकरणावरुन संसदेत आजही गदारोळ झाला. सुषमा स्वराज यांना विरोधकांनी लक्ष्य केलं. सुषमा स्वराज यांनी आपल्या निवेदनात सगळे आरोप फेटाळलेत. ललित मोदी यांना कोणत्याही प्रकारची मदत केली नसल्याचं स्पष्टीकरण स्वराज यांनी दिलं. 

मात्र त्यावर विरोधकांचं समाधान झालं नाही. या गोंधळात राज्यसभा १२ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आली होती.

संसद ठप्प करून देशाच्या प्रगतीत बाधा - नक्वी

संसदेतील गदारोळावरुन सत्ताधारी भाजपनं काँग्रेसवर हल्लाबोल केलाय. संसद ठप्प करुन काँग्रेस देशाच्या प्रगतीला बाधा आणतंय, अशी टीका भाजपचे ज्येष्ठ नेते मुख्तार अब्बास नक्वी यांनी केलाय. 
 
राहुल गांधींनी माफी मागावी - गडकरी

तर काँग्रेसच्या आडमुठ्या भूमिकेमुळंच संसदेचं कामकाज ठप्प असल्याचा आरोप  केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केलाय. तसंच परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधींनी माफी मागावी अशी मागणीही गडकरींनी केलीय. 
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.