गोडसे भक्तांवर कारवाई करा - राजनाथ सिंग

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी गुरुवारी राज्य सरकारांना 'गोडसे भक्तांवर' कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. 

Updated: Mar 5, 2016, 01:19 PM IST
गोडसे भक्तांवर कारवाई करा - राजनाथ सिंग title=

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी गुरुवारी राज्य सरकारांना 'गोडसे भक्तांवर' कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. संसदेत बोलताना 'कोणी नथुराम गोडसेची पूजा कशी काय करू शकतं?' असा सवाल त्यांनी केला.

स्वतःच्या पक्षाला महात्मा गांधीची हत्या करणाऱ्या नथुरामच्या समर्थकांपासून दूर करत केंद्राने कोणत्याही राज्य सरकारला नथुरामाची पूजा करणाऱ्यांवर कारवाई करण्यापासून रोखले नसल्याचे राजनाथ सिंग म्हणाले.

शुक्रवारी, मात्र हिंदू महासभेच्या काही सदस्यांनी नथुराम गोडसे आपले 'हिरो' असल्याचं म्हटले होते. असं म्हटल्यामुळे आपल्यावर कोणीही कसलीही कारवाई होण्याची कसलीही भीती वाटत नसल्याचेही ते म्हणाले होते.

'आम्ही आमच्या पक्षाच्या नेत्याचे नावाचा उद्धार करणार नाही तर कोणाचा करणार? नथुराम आमचे नायक होते आणि आहेत. त्यांच्यामुळेच भारताचे अनेक तुकडे होण्यापासून वाचले. महात्मा गांधींना मारुन त्यांनी चुकीचं काय केलं? गांधी हे काही संपूर्ण 'भारत' नाहीत आणि म्हणूनच नथुरामांचा गौरव करणे आम्हाला राष्ट्रद्रोही ठरवत नाही,' असं वक्तव्य हिंदू महासभेच्या भरत राजपूत यांनी नुकतंच केलं होतं.  

गेले काही दिवस संसदेत सरकारला काही घडामोडींना तोंड देण कठीण जात आहे. हिंदुत्ववादी संघटनांशी संबंधित व्यक्तींद्वारे केल्या जाणाऱ्या भडकाऊ भाषणांचा मुद्दा संसदेत वारंवार उपस्थित केला जात असल्याने सरकारच्या अडचणी वाढत आहेत.