पत्नी बेपत्ता; विरहात मंत्र्यानं सोडला प्राण

हरियाणाचे माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तेजेंद्र पाल मान यांचं रविवारी रात्री उशीरा दिल्लीमध्ये निधन झालंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jul 16, 2013, 01:53 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
हरियाणाचे माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तेजेंद्र पाल मान यांचं रविवारी रात्री उशीरा दिल्लीमध्ये निधन झालंय. उत्तराखंडमध्ये आलेल्या महाप्रलयात त्यांची पत्नी पुष्पा या बेपत्ता झाल्या होत्या. याचा तीव्र धक्का तेजेंद्र यांना बसला होता.
१६ मे पासून उत्तराखंडमध्ये आलेल्या महापुरात तेजेंद्र पाल यांची पत्नी पुष्पा मान, मेहुणा सतबीर लांबा आणि सतबीर यांची पत्नी वीना लांबा हे बेपत्ता झाले होते. गेल्या तीन जुलै रोजी तेजेंद्र पाल यांनी पत्नीचा काहीही ठावठिकाणा न लागल्यानं त्यांना मृत मानून शांतिपाठही केला होता. तेव्हापासूनच त्यांना तीव्र धक्का बसला होता.

तेजेंद्र पाल यांच्या कौटुंबीक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रविवारी रात्री नऊच्या सुमारास करनालस्थित राहत्या घरी त्यांच्या अचानक छातीत दुखू लागलं. त्यानंतर त्यांना तात्काळ दिल्लीच्या मॅक्स हॉस्पीटलमध्ये भर्ती करण्यात आलं. इथं डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. ७६ वर्षीय तेजेंद्र पाल यांच्या मागे त्यांची दोन मुले बोनी आणि बॉबी आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.