काश्मीरमध्ये राष्ट्रीय रायफल्स कॅम्पवर दहशतवादी हल्ला

जम्मू आणि काश्मीरच्या बारामुला भागातील आर्मी कॅम्पवर दहशतवादी हल्ला झाला आहे. या ठिकाणी भारतीय लष्कर चोख उत्तर देत आहे. रात्री साडेदहाच्या सुमारास हा हल्ला झाला आहे. 

Updated: Oct 2, 2016, 11:16 PM IST
काश्मीरमध्ये राष्ट्रीय रायफल्स कॅम्पवर दहशतवादी हल्ला

बारामुला : जम्मू आणि काश्मीरच्या बारामुला भागातील आर्मी कॅम्पवर दहशतवादी हल्ला झाला आहे. या ठिकाणी भारतीय लष्कर चोख उत्तर देत आहे. रात्री साडेदहाच्या सुमारास हा हल्ला झाला आहे. 

दहशतवाद्यांची संख्या तीन ते चार असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रीय रायफल्सच्या कॅम्पवर हा हल्ला झाला असल्याचं सांगण्यात येत आहे.

यापूर्वी जम्मू-काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये आर्मी कॅम्पवर हल्ला झाला होता,  तो हल्ला दहशतवाद्यांनी पहाटेच्या वेळी केला होता.