काश्मीरमध्ये कडाक्याच्या थंडीत दहशतवाद्याला कंठस्नान

काश्मीरमध्ये कडाक्याच्या थंडीत सुरक्षा यंत्रणा अतिरेक्यांशी दोन हात करतायेत. बर्फाच्छादीत सोपोरमध्ये एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात यश भारतीय जवानांना य़श आले आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jan 10, 2014, 10:52 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, काश्मीर
काश्मीरमध्ये कडाक्याच्या थंडीत सुरक्षा यंत्रणा अतिरेक्यांशी दोन हात करतायेत. बर्फाच्छादीत सोपोरमध्ये एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात यश भारतीय जवानांना य़श आले आहे.
रखरखीत वाळवंट असो की कडाक्याची थंडी. आपले सैनिक कायमच डोळ्यात तेल घालून आपल्या सीमांचे रक्षण करतात. काश्मीरचा उत्तर भाग सध्या बर्फानं गारठलेला असताना पाकिस्तानातून नेहमीच धुसखोरीचे प्रयत्न होत असतात.असाच एक प्रयत्न जम्मू-काश्मीर पोलीस, सीआरपीएफचे जवान आणि राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांनी अतिरेक्यांचा एक प्रयत्न हाणून पाडला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यावेळी एका जवानाला कंठस्नान घालण्यात आलंय. तर दोन अतिरेकी अद्याप दडून बसले आहेत. त्यांना शोधून काढण्यासाठी कोम्बिंग ऑपरेशन हाती घेण्यात आलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.