www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
१४ जुलै रोजी रात्रीच्या बाराच्या ठोक्याला केवळ १५ मिनिटं बाकी होती... आणि या क्षणी एक तार पाठवली होती. मुख्य म्हणजे ही ‘तार’ तारसेवा बंद होण्यापूर्वीची शेटवची तार ठरलीय... आणि ती पाठविली गेली काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना.
टेलीग्राम सेवेचं काऊंटर रात्री ११ वाजून ४५ मिनिटांनी बंद झालं. यावेळेपर्यंत ६८,८३७ रुपयांच्या तार धाडल्या गेल्या होत्या... हे तार सेवेचं शेवटच्या दिवसाचं उत्पन्न... आणि याचसोबत भारताच्या पिढ्यांपासून चालत आलेल्या, चांगला-वाईट समाचार देणाऱ्या तार सेवेचा अंत झाला.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, रविवारी एकूण मिळून २,१९७ बुकिंग झाल्या होत्या. यापैंकी संगणकाच्या माध्यमातून १,३२९ तारांचं बिलिंग केलं गेलं तर फोनवरून ९१ बुकिंग झाल्या होत्या.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.