पॉवरफुल पासपोर्टच्या यादीत पाहा भारताचे स्थान

नवी दिल्ली : आर्थिक अहवाल प्रसिद्ध करणाऱ्या आर्टन कॅपिटल या संस्थेने जगातील पॉवरफुल पासपोर्टची यादी जाहीर केलीय.

Updated: Feb 4, 2016, 10:49 AM IST
पॉवरफुल पासपोर्टच्या यादीत पाहा भारताचे स्थान  title=

नवी दिल्ली : आर्थिक अहवाल प्रसिद्ध करणाऱ्या आर्टन कॅपिटल या संस्थेने जगातील पॉवरफुल पासपोर्टची यादी जाहीर केलीय. यात अग्रकमांकावर दोन देश आहेत ते म्हणजे ग्रेट ब्रिटेन आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. 

या देशातील पासपोर्टधारी नागरिक व्हिसाशिवाय १४७ देशांत फिरू शकतात. या यादीत भारत ५९व्या क्रमांकावर आहे. एका देशातील पासपोर्टधारी नागरिक दुसऱ्या किती देशांत व्हिसाशिवाय प्रवास करू शकतात यावरुन त्या देशाला जगात मिळणारा मान आणि त्या देशाची ताकद याचा अंदाज येतो.

व्हिजाशिवाय प्रवास करता आल्याने नागरिकांना व्हिसासाठी विविध देशांच्या नोकरशाहीचाही सामना करावा लागत नाही. या यादीत सर्वोच्च स्थानी प्रगत जगातीलच देश आहेत. तर सर्वात खालच्या स्थानावर दक्षिण सुदान आणि पॅलेस्टाईन हे देश आहेत; येथील नागरिक केवळ २८ देशांत व्हिजाशिवाय प्रवास करू शकतात.

टॉप १० देशांची यादी
१. द युनायटेड किंग्डम - १४७ देश
२. द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका - १४७ देश
३. दक्षिण कोरिया - १४५ देश
४. जर्मनी - १४५ देश
५. फ्रान्स - १४५ देश
६. इटली - १४४ देश
७. स्वीडन - १४४ देश
८. सिंगापूर - १४३ देश
९. जपान - १४३ देश
१०. फिनलंड - १४३ देश