बरेली: एकीकडे सरकार शहींदाच्या कुटुंबियांना मदतीचं आश्वास देत आहे, तर दुसरीकडे शहीद कुटुंबियांतील महिला सुरक्षित नाहीत.
बरेलीमध्ये एक शहीद विधवेवर तिच्याच सासऱ्यानं आणि दिरानं बलात्कार केल्याची घटना घडलीय. सोबत आपल्याला बंधक बनवून ठेवल्याचा आणि सरकारकडून मिळालेली ५० लाखांची मदत हडपल्याचा आरोपही पीडित महिलेनं केलाय.
आणखी वाचा - २५ टक्के भारतीय पुरुषांचा लैंगिक हिंसेत सहभाग
महिलेचा आरोप आहे की, जेव्हा तिनं सासरच्या अत्याचारांची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये केली तेव्हा तिला घरातून काढून दिलं. पण तिच्या तीन वर्षीय मुलीला त्यांनी आपल्याजवळच ठेवलं. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी सासरे आणि दिराविरोधात बलात्कार, मारहाण आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय.
महिलेचे पती भारतीय सैन्यात होते आणि सप्टेंबर २०१२मध्ये ते शहीद झालेत. महिलेनं घटनेची माहिती देतांना सांगितलं की, तिच्या सासऱ्यांनी तिला तिच्या दिरासोबत लग्न कर, म्हणत फसवलं आणि बलात्कार केला.
आणखी वाचा - धक्कादायक: इंजीनिअरनं यूट्यूबवर टाकला पत्नीचा अश्लील व्हिडिओ
महिलेच्या सासरची मंडळी याबाबत काहीही बोलण्यास तयार नाहीत. शहीद विधवेनं सरकारकडे मदतीची मागणी केलीय. जर सरकारनं तिला मदत केली नाही तर सरकारवरचा विश्वासच उडून जाईल, असं ती म्हणाली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.