पंजाबच्या जनतेनं दुष्टांचं गर्वहरण केलं - नवज्योतसिंग सिद्धू

पंजाब विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठे यश मिळताना दिसतेय. काँग्रेसने ७०हून अधिक जागांवर आघाडी घेतलीये.

Updated: Mar 11, 2017, 12:36 PM IST
पंजाबच्या जनतेनं दुष्टांचं गर्वहरण केलं - नवज्योतसिंग सिद्धू title=

चंदीगड : पंजाब विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठे यश मिळताना दिसतेय. काँग्रेसने ७०हून अधिक जागांवर आघाडी घेतलीये.

काँग्रेसचे उमेदवार नवज्योतसिंग सिद्धू यांनाही अमृतसर पूर्व या मतदारसंघातून मोठी आघाडी मिळालीये. त्यांनी तब्बल २८,७६५ मतांनी आघाडी घेतलीये.

भाजपचे राजेश कुमार हनी मोठ्या संख्येने पिछाडीवर आहेत. यादरम्यान सिद्धू यांनी पत्रकार परिषदेत पंजाबच्या जनतेने दृष्टांचे गर्वहरण केले असून धर्माचा विजय झाल्याची प्रतिक्रिया दिली. तसेच पंजाबमध्ये जे काही कॅम्पेन करु शकलो त्याचे श्रेय कार्यकर्त्यांना आणि पत्नीला असल्याचेही ते म्हणाले.