मुलांनी जाळली तीन जिवंत कुत्र्यांची पिल्लं

कुत्र्यांची तीन जिवंत पिल्लं जाळल्याची धक्कादायक घटना हैदराबादच्या मुशीराबाद भागामध्ये घडली आहे.

Updated: Jul 21, 2016, 08:01 PM IST
मुलांनी जाळली तीन जिवंत कुत्र्यांची पिल्लं title=

हैदराबाद : कुत्र्यांची तीन जिवंत पिल्लं जाळल्याची धक्कादायक घटना हैदराबादच्या मुशीराबाद भागामध्ये घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आठ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं आहे. 

ही सगळी मुलं दहा ते सतरा वयोगटातली आहेत. शनिवारी दुपारी ही घटना घडली होती, पण मंगळवारी कुत्र्यांच्या पिल्लांना जाळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या मुलांनी रस्त्यावर फिरणाऱ्या कुत्र्यांच्या पिल्लांना पकडलं आणि त्यांना आगीमध्ये टाकून दिलं.