तूर खरेदीबाबत मुख्यमंत्र्यांनी आणली दिल्लीतून खुशखबर

 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत नक्षलवाद विरोधी परिषदेत उपस्थिती लावली तर तूरडाळ संदर्भात केंद्रीय कृषी मंत्र्यांची भेट घेतली.

Updated: May 8, 2017, 11:00 PM IST
 तूर खरेदीबाबत मुख्यमंत्र्यांनी आणली दिल्लीतून खुशखबर  title=

नवी दिल्ली :  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत नक्षलवाद विरोधी परिषदेत उपस्थिती लावली तर तूरडाळ संदर्भात केंद्रीय कृषी मंत्र्यांची भेट घेतली.

महाराष्ट्रात १ लाख टन तूरडाळ खरेदी करण्यासाठी केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषिमंत्री राधामोहन सिंग यांची भेट घेऊन प्रस्ताव सादर केला. तर नक्षलवादी विरोधी सामना करण्यासाठी जेएनयू सारख्या विद्यापीठातील नक्षलवादी समर्थकांना रोखण्याचा मुख्य अजेंडा सरकारने हाती घेतला आहे. 

यासंदर्भात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणवीस यांच्याशी केलेली खास बात... 

नक्षलवाद पॉईंटर्स ... 

- या भागात विकास कामे, कनेक्टीविटी वर भर द्यायला हवा. 
- तंत्रग्यानाचा उपयोग वाढविणे गरजेचे. प्रत्येक घरात वीज , रस्ते व पुलांची कामे करण्यावर भर असेल.
- दिल्ली, जेएनयू या विद्यापीठांत समर्थक आहे. त्यांचा मुकाबला करण्याचा आमचा अजेंडा आहे. 
- प्राध्यापक साई बाबा यांच्या कन्विक्शननंतर नक्षलवादांमध्ये घबराट पसरली आहे.

तूरडाळ... 

- ३१ मे पर्यंत तूरडाळ खरेदी केली जाईल. 
- जुन्या सरकारमध्ये केवळ २० हजार टन खरेदी केली होती. आम्ही साडेपाच लाख टन तूर खरेदी केली आहे.