तिरंगाः FB वर शेअर होतोय चुकीचा मेसेज

फेसबूकवर आजकाल एक मेसेज जबरदस्त शेअर केला जात आहे की तिरंग्याला आपले डिस्प्ले पिक्चर बनविणे आणि तिरंग्याचा फोटो शेअर करणे बेकायदा आहे. तसेच असे करणे नॅशनल फ्लॅग कायदा १९७१ नुसार उल्लंघन आहे आणि तसेच असे केल्यास आपण ध्वज संहिता तोडण्याचे दोषी होऊ शकतात. 

Updated: Aug 12, 2014, 08:06 PM IST
तिरंगाः FB वर शेअर होतोय चुकीचा मेसेज title=

मुंबई : फेसबूकवर आजकाल एक मेसेज जबरदस्त शेअर केला जात आहे की तिरंग्याला आपले डिस्प्ले पिक्चर बनविणे आणि तिरंग्याचा फोटो शेअर करणे बेकायदा आहे. तसेच असे करणे नॅशनल फ्लॅग कायदा १९७१ नुसार उल्लंघन आहे आणि तसेच असे केल्यास आपण ध्वज संहिता तोडण्याचे दोषी होऊ शकतात. 

आम्ही तुम्हांला सांगतो की हा मेसेज चुकीचा आहे आणि तुम्ही तिरंग्याला आपले डिस्प्ले पिक ठेऊ शकतात आणि कोणत्याही पद्धतीने तिरंग्याप्रती आपले प्रेम आणि भावना व्यक्त करू शकतात. 

१५ ऑगस्ट जवळ आल्यानंतर अनेक लोकांनी आपला डिस्प्ले पिक म्हणून तिरंगा लावला आहे. त्यानंतर फेसबूकवर हा भ्रामक संदेश टाकण्यात आला आहे. याबाबत कायद्याचे जाणार म्हणतात की, प्रत्येक भारतीयाला तिरंग्याच्या वापराबद्दल संपूर्ण स्वातंत्र्य आहे. या संदर्भात मुंबईचे वकील बी. एम. बिराजदार म्हणतात की, सुप्रीम कोर्टाने स्पष्ट सांगितले आहे की राष्ट्रीय ध्वजाद्वारे देशप्रेम जाहीर करण्यापासून कोणत्याही नागरिकाला बंदी नाही. फ्लॅग कोड २००२नुसार निर्बंध वापराची परवानगी देतो, पण यात राष्ट्रध्वजाचा अपमान व्हायला नको. 

फ्लॅग फाउंडेशनचे सीईओ के. व्ही. सिंग म्हणतात की, फेसबूकवर चालविण्यात आलेला भ्रामक आहे. २००२मध्ये नवा फ्लॅग कोड आल्यानंतर यापूर्वीचा कायदा निष्प्रभावी होतो. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.