‘माकप’च्या नेत्याची करामत, झोपण्यासाठी नोटांचं अंथरुण!

“मी इतकं श्रीमंत असावं, की नोटांवर लोळता येईल”, असं स्वप्न अनेक लोक बघतात. पण त्रिपुरातल्या माकपच्या नेत्यानं हे खरं करुन दाखवलंय. त्याच्या या प्रकारामुळं हा माकप नेता संकटात तर तापडलाच आहे. मात्र यामुळं सगळीकडे संतापही व्यक्त केला जातोय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Oct 20, 2013, 09:10 AM IST

www.24taas.com , वृत्तसंस्था, आगरतळा
“मी इतकं श्रीमंत असावं, की नोटांवर लोळता येईल”, असं स्वप्न अनेक लोक बघतात. पण त्रिपुरातल्या माकपच्या नेत्यानं हे खरं करुन दाखवलंय. त्याच्या या प्रकारामुळं हा माकप नेता संकटात तर तापडलाच आहे. मात्र यामुळं सगळीकडे संतापही व्यक्त केला जातोय.
जोगेंद्रनगर कमिटीचा सदस्य आणि व्यवसायानं कंत्राटदार असलेला समर आचार्यजी हा नेता स्वत:च्याच बँक खात्यातून काढलेल्या चलनी नोटांच्या बंडलांचं अंथरुण करून त्यावर लोळत पडला असल्याचं दूरदर्शनवरील एका फुटेजमधून स्पष्ट झालं.
त्रिपुरातील स्थानिक वृत्तवाहिनीवर सध्या सुरू असलेल्या या बातमीत कम्युनिस्ट नेते समर आचार्यजी यांची एक छोटी मुलाखतही आहे, त्यामध्ये त्यानं अडीच कोटी रूपयांची कमाई कशी केली तेही अभिमानानं सांगतात. आगरतळा शहराच्या तीन वॉर्डमध्ये त्यांना २४०० स्वस्त शौचायल बनविण्याचा ठेका मिळाला होता, त्यातूनच त्यांनी ही कमाई केल्याचं कॅमेऱ्यासमोर सांगितलंय.
तसंच नोटांच्या अंथरूणावर झोपण्याचा आनंद काय असतो याचा अनुभव घ्यायची इच्छा खूप दिवसांपासून आहे. त्यासाठीच आज बँकेतून तब्बल २० लाख रूपये काढले. आता मी नोटांच्या अंथरूणावर झोपू शकतो. मी माझ्या पक्षाच्या अन्य नेत्यांप्रमाणे खोटा दिखावा करत नाही. ते गरीब असल्याचं दाखवतात, स्वतःला गरीबांचे कैवारी म्हणवतात, पण प्रत्यक्षात त्यांच्याकडे खूप संपत्ती आहे. माझ्याकडं संपत्ती असेल तर मी नोटांच्या अंथरूणावर झोपलो तर बिघडलं कुठं?असंही आचार्यजी म्हणाले.
त्रिपुरातील स्थानिक वृत्तवाहिनीवरून समर आचार्य यांचा नोटांच्या गादीवर झोपल्याचा व्हिडिओ प्रसारित झाल्याबरोबर मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या स्थानिक शाखेचे सचिव समर चक्रवर्ती यांनी या प्रकरणाची पक्ष चौकशी करणार असल्याचं स्पष्ट केलं. समर आचार्यजी यांचा हा व्हिडिओ प्रसारित झाल्याबरोबर राज्यात विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने राज्यातील सर्वच कम्युनिस्ट नेत्यांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी केलीय.
दरम्यान, या व्हिडिओमुळं समर आचार्य आता संकटात सापडलाय. माकपचे राज्य सचिव बिजन धर म्हणाले, पक्षाकडून याबाबतचा तपास केला असता, आचार्य यांनी स्वत: आपल्या मोबाईलमध्ये हा व्हिडिओ शूट केल्याचं कळतंय. मात्र त्यांच्या एका मित्रानं तो व्हिडिओ टीव्हीवर लीक केला. या प्रकरणाची पक्षाच्या बैठकीत चर्चा केली जाणार असून आचार्य यांच्याविरुद्ध कारवाई केली जाईल, असंही बिजन धर म्हणाले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.