खिशातल्या ५० रुपयांचे 'त्या'नं बनवले करोडो... पण, ही जादू नाही!

खिशात अवघे ५० रुपये घेऊन एक भारतीय देशाबाहेर पडतो... आणि आज तो करोडो रुपयांचा मालक म्हणून समोर येतो. 

Updated: May 27, 2016, 06:18 PM IST
खिशातल्या ५० रुपयांचे 'त्या'नं बनवले करोडो... पण, ही जादू नाही! title=

मुंबई : खिशात अवघे ५० रुपये घेऊन एक भारतीय देशाबाहेर पडतो... आणि आज तो करोडो रुपयांचा मालक म्हणून समोर येतो. 

ही आहे खरीखुरी कहाणी... 

ही काही फिल्मी कहाणी नाही तर पीएनसी मेनन यांची खरीखुरी यशोगाथा आहे. केरळच्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेले मेमन १० वर्षांचे असतानाच त्यांच्या वडिलांचं निधन झालं. कसंबसं प्राथमिक शिक्षण पूर्ण झालं... मात्र कॉलेज शिक्षणासाठी कुटुंबाची आर्थिक परिस्थिती आड आलीच... आणि मग शिक्षण तिथच थांबलं.

परिस्थितीशी झगडून... 

तरीही हार न मानता कोणत्याही प्रोफेशनल डिग्रीशिवाय मेनन यांनी 'इंटिरिअर अॅन्ड डिझाईन'शी संबंधीत अनेक छोट्या - मोठ्या गोष्टी शिकून घेतल्या. १९७६  साली त्यांची भेट सुलेमान नावाच्या एका व्यक्तीशी झाली.

भारतातून ओमानला प्रयाण.... 

सुलेमान हा स्वत: एका मध्यमवर्गीय कुटुंबातून होता. त्यानं मेनन यांना ओमानला बोलावून घेतलं. ओमानसाठी उड़्ड़ान करताना मेनन यांच्या खिशात केवळ ५० रुपये होते. ओमानमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी तिथं इंटिरिअर डेकोरेशनचं काम सुरु केलं. 

स्वकष्टावर मिळवली ओळख

दिवसाची रात्र अन् रात्रीचा दिवस करत स्वकष्टावर मेनन १९८४ पर्यंत व्यावसायिक म्हणून आपली ओळख बनविण्यात यशस्वी झाले. त्यांच्या 'द सर्व्हिस ट्रेड ग्रुप ऑफ कंपनीज'ला ओमानच्या टॉप कंपन्यांमध्ये स्थान मिळालं.  

फोर्ब्सनंही घेतली दखल

मेनन यांनी २००७-०८ च्या फोर्ब्सकडून जाहीर करण्यात आलेल्या श्रीमंत व्यक्तींच्या लिस्टमध्ये स्थान मिळवलंय. त्यांनी आपला बिझनेस भारतातही रुंदावलाय. आपल्या पत्नीच्या नावावर 'शोभा डेव्हलपर्स' ही कंपनी त्यांनी भारतात सुरु केली. या कंपनीचा आजचा टर्नओव्हर १५०० करोडच्या घरात आहे. भारतातल्या १२ राज्यांत या कंपनीची उलाढाल सुरू आहे. जवळपास ३००० लोकांना ही कंपनी रोजगार उपलब्ध करून देतेय.