धक्कादायक! दोन मोठ्या सिंहांचा गाडीवर हल्ला

या धक्कादायक व्हिडीओत दोन भले मोठे सिंह जंगल सफारीसाठी निघालेल्या गाडीवर हल्ला करताना दिसतात. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 1, 2017, 06:17 PM IST

बंगळुरू : सिंहाने गाडीवर हल्ला केल्याचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. या धक्कादायक व्हिडीओत दोन भले मोठे सिंह जंगल सफारीसाठी निघालेल्या गाडीवर हल्ला करताना दिसतात. 

बीबीपी म्हणजेच बानरघाटा बायोलॉजिकल पार्क ऑफ बंगळुरूमधील ही घटना आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, तसेच हा हल्ला कसा झाला हे पाहण्याचं सर्वांनाच कुतूहल वाढत आहे.