छत्तीसगडमध्ये सापडला दुतोंडी साप

दुतोंडीसापाच्या कथा आपण नेमीच वाचतो आणि ऐकतो पण, छत्तीसगडमधील रायपूरच्या नागरीकांना चक्क प्रत्यक्षात हा साप पहायला मिळाला आहे. 

Updated: Jul 10, 2016, 07:11 PM IST
छत्तीसगडमध्ये सापडला दुतोंडी साप  title=

रायपूर : दुतोंडीसापाच्या कथा आपण नेमीच वाचतो आणि ऐकतो पण, छत्तीसगडमधील रायपूरच्या नागरीकांना चक्क प्रत्यक्षात हा साप पहायला मिळाला आहे. 

महासमुंद गावच्या जंगलात गावक-यांना हा साप आढळून आला. ग्रामस्थांनी त्याला पकडून वनविभागाच्या कर्मचा-यांकडे सुपुर्द केलं आणि त्यानंतर त्याची रवानगी नंदनवनच्या प्राणीसंग्रहालयात करण्यात आली आहे. 

सँड बोवा अर्थात मांडवळ जातिच्या या सापाला सध्या राजधानी रायपूरच्या नंदनवन या प्राणीसंग्रहालयात ठेवण्यात आलं आहे. डुरक्या घोणस असंही या सापाला संबोधलं जातं. बिनविशारी असलेला हा साप सरडे आणि पाल, बेडूक खाऊन आपली गुजारण करतो.