मुंबई: मुंबई विमानतळावर शनिवारी आढळलेल्या संशयास्पद पॅराशूटचं गूढ अखेर उलगडलंय. ते पॅराशूटनसून मोठे एअर बलून होते, अशी माहिती पोलिसांनी दिलीय.
शनिवारी एअर इंडिया मैदानावर एका डायमंड कंपनीतर्फे क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेच्या उद्घाटनादरम्यान आयोजकांनी हवेत एअर बलून सोडले होते. विना परवानगी एअर बलून सोडल्याप्रकरणी पोलिसांनी दोघा आयोजकांना अटक केलीय. या दोघांना आज कोर्टासमोर हजर केलं जाणार आहे.
शनिवारी संध्याकाळी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीजवळ पॅराशूटसारख्या पाच वस्तू हवेत उडताना आढळल्या होत्या. एका वैमानिकानं याची माहिती हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला दिल्यावर काही वेळेपुरता विमानतळावरील विमानांचं टेक ऑफ आणि लँडिंग थांबवण्यात आलं होतं. या घटनेनं एकच खळबळ उडाली होती आणि थेट पंतप्रधान कार्यालयानंच या संदर्भात अहवाल मागवला होता. नागरी हवाई उड्डाण महासंचालनालयाचं पथकही चौकशीसाठी आज मुंबईत येणार होतं. तर मुंबई पोलिसही या घटनेचा तपास करत होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.