बारामुल्ला जिल्ह्यात जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक

भारतीय लष्करानं पाकिस्तानच्या सात रेंजर्सना ठार केल्यानंतरही पाकिस्ताननं पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केले आहे. दरम्यान, बारामुल्ला जिल्ह्यात जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली.

PTI | Updated: Oct 22, 2016, 05:43 PM IST
बारामुल्ला जिल्ह्यात जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक

जम्मू काश्मीर : भारतीय लष्करानं पाकिस्तानच्या सात रेंजर्सना ठार केल्यानंतरही पाकिस्ताननं पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केले आहे. दरम्यान, बारामुल्ला जिल्ह्यात जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली.

राजौरीत पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला आहे. दरम्यान  जम्मू काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील कनीसपोरा भागातून शुक्रवारी रात्री जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. 52 राष्ट्रीय रायफल्स आणि विशेष कृती दलाच्या अधिका-यांनी केलेल्या संयुक्त कारवाईत या दोघांना अटक केली.

16 ऑगस्ट 2016 रोजी लष्करावर झालेल्या हल्ल्यात या दहशतवाद्यांचा हात होता. या दोघांकडून एके 47 रायफल्स, पिस्तुल, ग्रेनेड जप्त करण्यात आलेत. तर सांबा सेक्टरमधूनही पाकिस्तानच्या एका गुप्तहेराला ताब्यात घेण्यात आलंय. त्याच्याकडे दोन पाकिस्तानी सिमकार्डस आणि नकाशा सापडला आहे.