‘दिग्विजय सिंगांचं डोकं फिरलंय’

ठाकरे घराणं हे मूळचं बिहारचं आहे, याबद्दल साफ नकार देताना उद्धव ठाकरेंनी ‘दिग्विजय सिंग यांचं डोकं फिरलंय’ अशी प्रतिक्रिया दिलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Sep 6, 2012, 02:36 PM IST

www.24taas.com, मुंबई
ठाकरे घराणं मूळचं बिहारचंच असं पुराव्यानिशी सांगणाऱ्या दिग्विजय सिंग यांच्यावर उद्धव ठाकरेंनी निशाना साधलाय. ठाकरे घराणं हे मूळचं बिहारचं आहे, याबद्दल साफ नकार देताना उद्धव ठाकरेंनी ‘दिग्विजय सिंग यांचं डोकं फिरलंय’ अशी प्रतिक्रिया दिलीय.
दिग्विजय सिंग यांनी पुरावा म्हणून सादर केलेल्या पुस्तकात ठाकरे घराणं बिहारचं असल्याचा कुठेही उल्लेख नाही... या पुस्तकात मराठीबद्दल सांगितलं गेलंय, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केलाय.
युतीच्या काळात मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र सरकारने प्रबोधनकार ठाकरे यांचे समग्र चरित्र प्रसिद्ध केले होते. प्रबोधनकार हे राज ठाकरे यांचे आजोबा आहे. या पुस्तकात ठाकरे कुटुंबियाच्या इतिहासावर काही विस्तारीत स्वरूपात माहिती आहे. या पुस्तकातील ४५ क्रमांक पानावरील उल्लेखानुसार ठाकरे परिवार मगध म्हणजे बिहारहून भोपाळला गेले होते. त्या ठिकाणाहून ते चित्तौडगड आणि नंतर पुण्याजवळ वास्तव्यास आल्याचे सांगण्यात आले आहे. याच पुस्तकाच्या आधारे दिग्विजय सिंग यांनी ठाकरे घराणं मूळचं बिहारचं असल्याचं वक्तव्य केलं होतं.