सावधान, तुमचं आधार कार्ड गॅस सब्सिडीशी लिंक करा...

आधार कार्डशिवाय आता गॅस सब्सिडी मिळणार नाहीय. आधार कार्ड गॅस सब्सिडीशी लिंक करण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. गॅस एजन्सीकडे जाऊन आधारकार्ड लिंक करता येणार आहे.

Updated: Oct 4, 2016, 08:16 PM IST
सावधान, तुमचं आधार कार्ड गॅस सब्सिडीशी लिंक करा...

नवी दिल्ली : आधार कार्डशिवाय आता गॅस सब्सिडी मिळणार नाहीय. आधार कार्ड गॅस सब्सिडीशी लिंक करण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. गॅस एजन्सीकडे जाऊन आधारकार्ड लिंक करता येणार आहे.

तसेच वर्षभरातून फक्त १२ सिलिंडर सब्सिडीतून मिळणार आहेत. वर्षभरातून १२ सिलिंडरच्या वर सिलिंडर घेतल्यास संपूर्ण किमतीत सिलिंडर मिळणार आहे.

केंद्र सरकारकडून अनेक वेळा, ज्यांचं वार्षिक उत्पन्न मोठ्या प्रमाणात आहे. त्यांना गॅस सब्सिडी सोडण्याची विनंती केली आहे.