नवी दिल्ली : उरी हल्ला प्रकरणी भारताचे विदेश सचिव एस. जयशंकर यांनी पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांना समन्स पाठवला आहे. पत्रकारांसोबत बोलतांना त्यांनी सांगितलं की, दहशतवादी आणि लष्कर यांच्यामध्ये 2 वेळा चकमक झाली. पाकिस्तानने सार्वजनिकरित्या सांगावं की आम्ही भारतविरुद्ध दहशतवादी कारवायांना थारा देणार नाही.'
भारत हा पाकिस्तानला त्या दहशतवाद्यांविरोधातील पुरावे देणार आहे. दहशतवाद्यांकडे पाकिस्तानातील औषधं, फूड आणि संपर्काची साधने मिळाली आहेत.
#UriAttack Foreign Secretary Jaishankar summons Pakistan High Commissioner Basit to MEA
— Vikas Swarup (@MEAIndia) September 21, 2016
We demand that Pakistan lives up to its public commitment to refrain from supporting & sponsoring terrorism against India #UriAttack pic.twitter.com/fytV5fcgl2
— Vikas Swarup (@MEAIndia) September 21, 2016