बुलंदशहर : उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथे एका 80 वर्षीय व्यक्तीने पत्नीच्या स्मरणार्थ छोटा ताजमहाल बांधला आहे. या छोट्या ताजमहालाच काम सध्या अपूर्ण आहे. आता यासाठी त्याला उत्तर प्रदेश सरकार मदत करणार आहे.
आपल्या पत्नीच्या स्मरणार्थ, फैजल हसन कादरी या निवृत्त पोस्ट मास्तरने, तिला दफन करण्याच्या ठिकाणी छोटा ताजमहाल उभारण्याचा निर्णय घेतला. या ताजमहालचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे, यासाठी त्याला उत्तर प्रदेश सरकार मदत करत आहे. फैजल हसन ८० वर्षांचे आहेत.
कासेर कलाम गावात हा छोटा ताजमहाल उभारण्यासाठी कादरी यांनी आपल्याजवळील सर्व जमा रक्कम या कामात लावली आहे. पैशाच्या कमतरतेमुळे गेल्यावर्षी याचे काम थांबविले होते. पण, आता उत्तर प्रदेश सरकार या कामात मला मदत करत आहे.
हा छोटा ताजमहल बांधण्यासाठी कादरी यांनी स्वतःचे १४ लाख रुपये खर्च केले. यानंतर जिल्हाधिकारी बी. चंद्रकला यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्याशी कादरींची भेट घडवून दिली. यानंतर त्यांना मुख्यमंत्र्यांनी मदतीचे आश्वासन दिले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.