'गोरक्षकांच्या अपमानाची किंमत 2019मध्ये मोजावी लागेल'

गोरक्षणाच्या नावाखाली गुंडगिरी चालत असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली होती.

Updated: Aug 8, 2016, 05:00 PM IST
'गोरक्षकांच्या अपमानाची किंमत 2019मध्ये मोजावी लागेल' title=

अहमदाबाद : गोरक्षणाच्या नावाखाली गुंडगिरी चालत असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली होती. या टीकेवर आता विश्व हिंदू परिषद चांगलीच भडकली आहे. मोदींना याची किंमत 2019मध्ये मोजावी लागेल, असं विश्व हिंदू परिषदेनं म्हटल आहे. मोदींवर टीका करणार पत्रक विश्व हिंदू परिषदेनं काढलं आहे. 

खाटिक दरवर्षी लाखो गायी मारतात, पण त्यांना गुंड न ठरवता गोरक्षकांना गुंड ठरवलं जातंय यावरूनच तुमची नियत दिसतेय असं या पत्रकात लिहिण्यात आलं आहे.