व्हिडिओ : नवजात बालकाचा हात उकळत्या तेलात टाकला!

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी मतदारसंघातली म्हणजेच रायबरेलीतली एक धक्कादायक घटना... अंधश्रद्धेचं भूत लोकांच्या मानगुटीवर कसं बसलंय... याचं वास्तव या घटनेतून ढळढळीतपणे समोर येतंय. 

Updated: May 20, 2015, 02:20 PM IST
व्हिडिओ : नवजात बालकाचा हात उकळत्या तेलात टाकला! title=

रायबरेली : काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी मतदारसंघातली म्हणजेच रायबरेलीतली एक धक्कादायक घटना... अंधश्रद्धेचं भूत लोकांच्या मानगुटीवर कसं बसलंय... याचं वास्तव या घटनेतून ढळढळीतपणे समोर येतंय. 

एका नवजात बालकाचं हात उकळत्या तेलात टाकण्याची धक्कादायक घटना समोर आलीय. त्याहून धक्कादायक म्हणजे, एका कथित दूर्धर अशा आजारातून सुटका मिळवण्यासाठी या चिमुकल्याच्या आईनंच त्याला या वेदना दिल्यात. रायबरेलीतल्या महाराजगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जिव्हरा गावातील ही घटना आहे. 

या गावातील नवजात शिशुंना एका मोठ्या कथित आजारानं घेरलंय... या आजाराचं नाव आहे जमूडा... जमूडा राक्षसानं एकदा लहानग्याला पकडलं की तो बालकाचा जीव घेऊनच जातो, असंही मानलं जातंय. या आजाराला लोक इतके घाबरलेत की अनेक जण या आजाराचं नावही उच्चारायला घाबरत आहेत. या आजारावर एकच उपाय आहे आणि तो म्हणजे चिमुकल्या बाळाचं एक बोट उकळत्या तेलात बुडवलं जावं.. आणि या आजारापासून मुलांना सुटका मिळते, अशी अंधश्रद्धा इथल्या स्थानिकांमध्ये पाहायला मिळतेय. 

हा उपाय दोन चिमुकल्यांवर आजमावण्यातही आलाय. यामध्ये एका बाळाला आपलं बोट गमवावं लागलंय तर दुसऱ्याला गंभीर इजा झालीय.  

व्हिडिओ पाहा :- 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

 

 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x