VIDEO : स्ट्रेचर न मिळाल्यानं पतीला फरपटत नेण्याची वेळ

आंध्रप्रदेशच्या अनंतपूरमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना घडलीय. 

Updated: Nov 18, 2016, 04:27 PM IST
VIDEO : स्ट्रेचर न मिळाल्यानं पतीला फरपटत नेण्याची वेळ title=

अनंतपूर : आंध्रप्रदेशच्या अनंतपूरमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना घडलीय. 

कथित रुपात, एका सरकारी हॉस्पीटलमध्ये आपल्या पतीवर उपचार करण्यासाठी एक महिला दाखल झाली होती. परंतु, या रुग्णालयातील स्टाफनं महिलेला स्ट्रेचर मिळाला नाही. त्यानंतर, या महिलेला आपल्या पतीला हाताला धरून फरपटत वार्डपर्यंत घेऊन जावं लागलं. 

रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी स्ट्रेचर द्यायला नकार दिल्यानं पतीला फरपटत न्यावं लागलं.. पतीच्या पायात इन्फेक्शन झाल्यानं त्याला चालता येत नव्हतं, असं या महिलेनं म्हटलंय.

महिलेनं एका हातानं आपल्या पतीला पकडून भिंतीच्या सहाय्यानं वॉर्डपर्यंत नेलं. ही घटना आपल्या डोळ्यांनी पाहणाऱ्यांपैंकीही या महिलेला कुणीही मदत केली नाही. 

ही घटना समोर आल्यानंतर सरकारनं चौकशीचे आदेश देत रुग्णालय प्रशासनाला आणखी व्हिलचेअरची व्यवस्था करण्यास सांगितलंय. मात्र, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.