लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे नाव बिहारमधील एका गावाला देण्यात आलेय. पूर्णिया जिल्ह्यातील कसबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्य़ा केलाबरी फुलवरिया या गावाला त्यांचे नाव देण्यात आलेय.,
पूर्णियापासून साधारण १५ किमी अंतरावर असणारे या गावात मुस्लिम रहिवाशांची संख्या अधिक आहे. विशेष म्हणजे एक एप्रिल रोजी या गावात झालेल्या ग्रामीण सभेत गावात मंदिर बनवण्याचा निर्णयही घेण्यात आला.
यासोबतच योगी आदित्यनाथ यांचे नाव गावाला देण्याच यावे असा प्रस्ताव या बैठकीत ठेवला होता. या प्रस्तावाला गावातील सर्व लोकांनी सहमती दर्शवली आणि प्रस्ताव मंजूर झाला.
ग्रामस्थांच्या मते गावाचे नाव बदलणे चुकीची गोष्ट नाहीये. योगी चांगले आणि ईमानदार नेता आहेत. उत्तर प्रदेशात ते चांगलं काम करतायत. त्यामुळे त्यांचे नाव देण्यात गैर नसल्याचे तेथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.