कोहली-रहाणेनं भारताला सावरलं

न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टच्या पहिल्या दिवशी विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेनं भारताला सावरलं आहे.

Updated: Oct 8, 2016, 06:15 PM IST
कोहली-रहाणेनं भारताला सावरलं title=

इंदूर : न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टच्या पहिल्या दिवशी विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेनं भारताला सावरलं आहे. विराट कोहलीनं नाबाद सेंच्युरी मारली आहे तर अजिंक्य रहाणे सेंच्युरीच्या उंबरठ्यावर आहे. दिवसाच्या शेवटी विराट कोहली 103 तर अजिंक्य रहाणे 79 रनवर खेळत आहे.

100 रनवर तीन विकेट गमावल्यानंतर मात्र कोहली आणि रहाणेनं पडझड रोखली आणि दिवसाअखेरीस भारतानं 267 रनवर 3 विकेट गमावल्या आहेत.

या टेस्टमध्ये भारतानं टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला पण ओपनर मुरली विजय आणि टीममध्ये कमबॅक करणाऱ्या गौतम गंभीरला चमकदार कामगिरी करता आली नाही. मुरली विजय 10 रनवर तर गंभीर 29 रनवर आऊट झाला. तिसऱ्या क्रमांकावर आलेला चेतेश्वर पुजाराला 41 रन बनवता आले. न्यूझीलंडच्या बोल्ट, पटेल आणि सॅन्टनरला प्रत्येकी एक विकेट घेण्यात यश आलं.