नवी दिल्ली : टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवागला वर्ल्डकप टीममधून वगळण्यात आलंय, त्यामुळे तो ‘फटकेबाजी‘ करण्यासाठी राजकीय मैदानात उतरणार आहे, अशी शक्यता व्य़क्त केली जात आहे.
वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली मात्र, सेहवागला यात स्थान मिळालं नाही, म्हणून सेहवागला राजकारणाची वाट मोकळी झाली असल्याचं बोललं जात आहे. काँग्रेस आणि भाजप, आपने सेहवागला उमेदवारी देण्यासाठी तयारी दाखवली आहे, मात्र कोणत्याही पक्षाला अजून सेहवागने उत्तर दिलेलं नाही.
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘सेहवागला उमेदवारी देण्याच्या शर्यतीमध्ये भाजपपेक्षा काँग्रेस पुढे आहे. गेल्या पाच वर्षांपासून सेहवागचे कुटुंबीय काँग्रेस पक्षाबरोबर राहिले आहे.
काँग्रेस पक्ष सेहवागला उमेदवार म्हणून घोषित करणार होते. परंतु, 2015 मध्ये होणाऱ्या विश्वकरंडक संघामध्ये त्याचा समावेश होण्याची शक्यतेमुळे करण्यात आले नाही.‘
सेहवाग आणि ‘आप‘मध्ये अनेक गोष्टींमध्ये साम्य आहे, यामुळे ‘आप‘ सेहवागला उमेदवारी देण्यासाठी इच्छुक आहे, असेही सूत्रांनी म्हटलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.