अहमदाबाद : गुजरात सरकारला राज्यात व्होडकाचा प्लान्ट उभारण्यासाठी एसबीएन ग्रुपनं एक ऑफर दिलीय.
जवळपास पाच हजार करोड रुपयांची गुंतवणूक करण्याची तयारी या कंपनीनं दर्शवलीय. यासाठी एक फूड पार्कही उभारलं जाईल... ज्यामध्ये प्लान्टशिवाय कोल्ड स्टोअरेजचीही सुविधा असेल. याशिवाय फळ-भाज्यांचे बाय प्रोडक्टच्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटचाही समावेश असेल.
उल्लेखनीय म्हणजे, 'ड्राय स्टेट' गुजरातमध्ये दारुबंदी आहे. यासाठी राज्य सरकारनं अनेक कठिण कायदेही लागू केलेत. परंतु, एका इंग्रजी दैनिकानं दिलेल्या माहितीनुसार, एसबीएन ग्रुपनं एक एमओयू (Memorandum of understanding) लिस्टेड केलं गेलंय... यावर वायब्रंट गुजरात ग्लोबल समिटमध्ये स्वाक्षऱ्या केल्या जातील. एमओयूमध्ये दिलेल्या माहितीनुसार, कंपनीनं फूड पार्कसाठी सरकारकडे 150 एकर जमिनीचीही मागणी केलीय.