व्यापम घोटाळा: जबलपूर वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीनचा दिल्लीत मृत्यू

मध्य प्रदेशमधील व्यापम गैरव्यवहाराचा पाठपुरावा करणाऱ्या पत्रकाराच्या मृत्यूपाठोपाठ आता जबलपूर वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. अरूण शर्मा यांचाही मृतदेह सापडल्यानं या घोटाळ्याचं स्वरूप भयंकर होताना दिसत आहे. 

Updated: Jul 5, 2015, 10:35 PM IST
व्यापम घोटाळा: जबलपूर वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीनचा दिल्लीत मृत्यू title=

नवी दिल्ली: मध्य प्रदेशमधील व्यापम गैरव्यवहाराचा पाठपुरावा करणाऱ्या पत्रकाराच्या मृत्यूपाठोपाठ आता जबलपूर वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. अरूण शर्मा यांचाही मृतदेह सापडल्यानं या घोटाळ्याचं स्वरूप भयंकर होताना दिसत आहे. दिल्लीतील द्वारका परिसरातील उत्पल हॉटेलमध्ये रविवारी सकाळी शर्मा यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला. 

शनिवारी या हॉटेलमध्ये आलेले शर्मा आज पुन्हा परतणार होते, मात्र त्यापूर्वीच आज सकाळी त्यांचा मृतदेह सापडल्यानं एकच खळबळ माजली आहे.
 
व्यापम घोटळाप्रकरणात आतापर्यंत २५ हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणात नाव आलेल्या एका तरूणीचा मृतदेह शनिवारी रेल्वे रुळाजवळ आढळला होता, त्या तरूणीच्या पालकांची मुलाखत घेणाऱ्या पत्रकाराचाही मृत्यू झाल्यानं खळबळ माजली होती... आणि आता डॉ. शर्मा यांच्या मृत्यूमुळं संशयास्पद वातावरण निर्माण झालंय. 

(With Agency Input)

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.