व्यापमं घोटाळा | परीक्षा देऊ नका, मात्र सिनेमा पाहून डॉक्टर व्हा

व्यापमं घोटाळ्यानंतर होत असलेल्या हत्यांमुळे अख्खा देश हादरला आहे. मात्र व्यापमं घोटाळा बाहेर आणण्यासाठी एका माहिती अधिकार कार्यकर्त्याला माहितीच्या अधिकाराची मोठी मदत झाली आहे, यामुळेच अनेकांचं बिंग फुटल्याचं समोर आलं आहे.

Updated: Jul 8, 2015, 11:26 AM IST
व्यापमं घोटाळा | परीक्षा देऊ नका, मात्र सिनेमा पाहून डॉक्टर व्हा title=

ग्वाल्हेर : व्यापमं घोटाळ्यानंतर होत असलेल्या हत्यांमुळे अख्खा देश हादरला आहे. मात्र व्यापमं घोटाळा बाहेर आणण्यासाठी एका माहिती अधिकार कार्यकर्त्याला माहितीच्या अधिकाराची मोठी मदत झाली आहे, यामुळेच अनेकांचं बिंग फुटल्याचं समोर आलं आहे.

माहिती कार्यकर्त्यावर १४ वेळेस हल्ले

सळपातळ दिसणाऱ्या २६ वर्षाचा आशीष चतुर्वेदी माहिती अधिकारानंतर चर्चेत आला आहे. आशीष चतुर्वेदीने दिलेल्या माहितीनुसार त्याच्यावर आतापर्यंत १४ वेळेस हल्ले झालेले आहेत. यातील सहा हल्ले हे सुरक्षेत पोलिस असतांना झाले आहेत.

आशीषने व्यापमं घोटाळ्यातील काही धक्कादायक गोष्टी बाहेर काढल्या, त्याची कहाणी देखील रंजक आहे. जवळ-जवळ सहा महिने आधी आशीषच्या आईवर ग्वाल्हेरच्या रूग्णालयात उपचार सुरू होते. तेव्हा आशीषच्या लक्षात आलं, नव्याने भरती झालेल्या डॉक्टरांना डॉक्टरकीतील ओ का ठो येत नाही.

परीक्षा सुरू होती, त्याच वेळी तो सिनेमा पाहत होता, तरीही डॉक्टर झाला

आशीषने हळूहळू त्या डॉक्टरांशी मैत्री केली, आणि त्यानंतर त्याला जी माहिती मिळाली त्यानंतर तो अवाक झाला. एका डॉक्टराने त्याला नाव न सांगण्याच्या अटीवर आणि सर्व गोपनीय ठेवण्याच्या अटीवर सांगितलं, 'जेव्हा माझी दिल्लीत एका परीक्षा केंद्रावर मेडिकलची परीक्षा होती, तेव्हा मी ग्वाल्हेरमध्ये सिनेमा हॉलमध्ये एकानंतर एक चित्रपट पाहत होतो'.

आशीषने त्यानंतर 'व्यापमं'च्या परिक्षा घोटाळ्याचा घोळ बाहेर आणण्याचा निश्चय केला.

सायकलीवर पोलिसांसोबत फिरतो आशीष

मध्य प्रदेशातील कथित डीमेट घोटाळ्यात सर्वात आधी आशीषने ग्वाल्हेरमध्ये बनावट परीक्षा देणारे विद्यार्थी असल्याची तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी सापळा रचला आणि एकानंतर एक असं अटक सत्र सुरू झालं. यानंतर आशीषवर हल्ले होत असल्याने, त्याला स्थानिक प्रशासनाकडून सुरक्षा देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत, तरीही सुरक्षा असतांना सहा वेळेस त्याच्यावर हल्ले झाले आहेत. आशीष आपल्या सायकलवर फिरत असतो, तेव्हा तो सायकल चालवतो आणि पोलिस कॉन्स्टेबल मागे बसलेला असतो.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.