सूनेचा क्रुरपणा, सासूला ठार मारण्याचा प्रयत्न सीसीटीव्हीत कैद

उत्तर प्रदेशमधील एका कुटुबांत सून आपल्या ७० वर्षीय सासूवर कसा अत्याचार करते, हे पाहिल्यावर अंगावर काटा उभा राहतो.

ANI | Updated: Jan 12, 2016, 08:50 AM IST
सूनेचा क्रुरपणा, सासूला ठार मारण्याचा प्रयत्न सीसीटीव्हीत कैद title=

लखनऊ : सासू -सून  यांच्यातील हेवेदावे आणि वाद नवे नाहीत. अनेक घरांत कमी जास्त प्रमाणात असं चित्र पाहायला मिळतं. मात्र उत्तर प्रदेशमधील एका कुटुबांत सून आपल्या ७० वर्षीय सासूवर कसा अत्याचार करते, हे पाहिल्यावर अंगावर काटा उभा राहतो.

पाहा बातमीच्या खालील व्हिडिओ

सासूला ठार मारण्याचा प्रयत्न करते. त्याची दृश्य पाहिल्यावर धक्का बसतो. ही सगळी थरारक दृश्ये सीसीटीव्हीत कैद झाली आहेत. यूपीतील बिजौरीया भागातील नेहतरमध्ये ही घटना घडली. संदीप जैन यांची पत्नी संगिता जैन हीने हे क्रूर कृत्य केले आहे. आपली सासू राजराणी जैन यांचा गळा आवळून मारण्याचा प्रयत्न केला.

इथपर्यंतच संगीताचा क्रूरपणा थांबत नाही. तर घरातील वरवंठा आणून डोक्यात घालत मारण्यापर्यंत तिची मजल गेली. पाच जानेवारीला दुपारी हा प्रकार घडलाय. खोलीत लपवलेल्या सीसीटीव्हीमुळे संगीताचा क्रुरपणा समोर आलाय. पोलिसांत या प्रकरणी तक्रार देण्यात आली आहे. सात वर्षांपूर्वी संगीताचं लग्न झालंय. आणि घटस्फोटाची प्रक्रिया सुरु आहे.