Watch: प्रजासत्ताक दिना निमित्त जेलमध्ये 'आयटम नंबर', पैशांचा पाऊस

 विजयपुरा जेलमध्ये  आयटम गर्लचा डान्स आयोजित करून हा दिवस साजरा केला जात असल्याचा संतापजनक आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला. 

Updated: Jan 28, 2016, 07:04 PM IST

 

विजयापुरा : गेल्या मंगळवारी सर्व भारतात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा होत असताना कर्नाटकातील विजयपुरा जेलमध्ये  आयटम गर्लचा डान्स आयोजित करून हा दिवस साजरा केला जात असल्याचा संतापजनक आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला. 

मुंबईतून दोन आयटम गर्ल विजयापुराच्या जेलमध्ये बोलविण्यात आल्या होत्या. जेल प्रशासनाने ही खास तजवीज करू ठेवली होती. जेलमधील कैद्यांची चांगल वागणूक होती म्हणून त्यांना ही खास ट्रीट देण्यात आली. 

यावेळी नागिन डान्सवर थिरकत होते तर काही जणांनी त्या आयटम गर्लवर पैशाांचा पाऊस पाडला. 

हा सर्व प्रकार कर्नाटकतील विजयापुरा जिल्ह्याचे पालक मंत्री एमबी पाटील आणि डेप्युटी कमिशनर कार्यक्रमाला येण्यापूर्वी घडला. 

यानंतर औपचारिक प्रजासत्ताक कार्यक्रम ३ वाजता पार पडला, त्यात ३८ कैद्याची सुटका करण्यात आली.