चोरी झालेल्या वाहनांसाठी 'वाहन समन्वय'

तुमच्या वाहनांची तुम्हीच काळजी घेतलेली बरी कारण, वाहन चोरी रोखण्यासाठी वाहनांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुनही महाराष्ट्रात वाहन चोरीच्या घटना कमी झालेल्या नाहीत. देशात वाहनचोरीमध्ये महाराष्ट्राचा उत्तरप्रदेश खालोखाल दुसरा क्रमांक लागला आहे.

Updated: Dec 27, 2014, 12:05 AM IST
चोरी झालेल्या वाहनांसाठी 'वाहन समन्वय' title=

मुंबई : तुमच्या वाहनांची तुम्हीच काळजी घेतलेली बरी कारण, वाहन चोरी रोखण्यासाठी वाहनांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुनही महाराष्ट्रात वाहन चोरीच्या घटना कमी झालेल्या नाहीत. देशात वाहनचोरीमध्ये महाराष्ट्राचा उत्तरप्रदेश खालोखाल दुसरा क्रमांक लागला आहे.

चोरी झालेल्या वाहनांची माहिती मिळावी, राज्य सरकारांमध्ये समन्वय रहावा यासाठी 'वाहन समन्वय' नावाचे संकेतस्थळ सुरु केल्याचे त्यांनी सांगितलं.

वाहनचोरी संबंधी लोकसभेत सादर झालेल्या आकडेवारीवरुन ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. २०१३ मध्ये उत्तरप्रदेशनंतर महाराष्ट्रात सर्वाधिक वाहन चोरीच्या घटनांची नोंद झाली आहे. २०१३ या एका वर्षात संपूर्ण देशभरातून १.६५ लाख गाडयांची चोरी झाली. लोकसभेचे सदस्य पी.पी.चौधरी यांनी विचारलेल्या प्रश्नातून ही माहिती समोर आली आहे.

चौधरी यांनी मागच्या तीन वर्षातील वाहन चोरीच्या किती तक्रारी दाखल झाल्या तसेच वाहन चोरी रोखण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर विविध राज्य सरकारांमध्ये समन्वय रहावा यासाठी संकेतस्थळ बनवण्याचा प्रस्तावाबद्दल माहिती मागितली होती.

त्यावर केंद्रीय गृहराज्यमंत्री एच.पी.चौधरी यांनी लिखित उत्तराव्दारे माहिती दिली. २०११ मध्ये वाहनचोरीच्या १.५१ लाख तक्रारी दाखल झाल्या. २०१२ मध्ये १.५४ लाख तर, २०१३ मध्ये १.६५ लाख वाहनचोरींच्या तक्रारी दाखल झाल्याचे त्यांनी सांगितले. चोरी झालेल्या वाहनांची माहिती मिळावी, राज्य सरकारांमध्ये समन्वय रहावा यासाठी ‘वाहन समन्वय’ नावाचे संकेतस्थळ सुरु केल्याचे त्यांनी सांगितलं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.