रेल्वेच खासगीकरण करणारच नाही- नरेंद्र मोदी

भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर रेल्वेच्या खासगीकरणाची शक्यता वर्तवली जात होती, मात्र ही शक्यता फेटाळून लावण्यात आली आहे.

Updated: Dec 26, 2014, 11:52 PM IST
रेल्वेच खासगीकरण करणारच नाही- नरेंद्र मोदी title=

वाराणसी : भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर रेल्वेच्या खासगीकरणाची शक्यता वर्तवली जात होती, मात्र ही शक्यता फेटाळून लावण्यात आली आहे.

 रेल्वे खासगीकरणाची शक्यता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेटाळून लावली आहे़ रेल्वेचे खासगीकरण करणार नाही़ याबाबतचे तर्कवितर्क निरर्थक व निराधार आहेत, अशी स्पष्टोक्ती मोदींनी दिली आहे़

गुरुवारी वाराणसी या आपल्या मतदारसंघात मोदींच्या हस्ते रेल्वे वर्कशॉप विस्तारीकरणाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते़ यावेळी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू उपस्थित होते़ रेल्वे खासगीकरणाला रेल्वे युनियनकडून विरोध सुरू आहे़ या पार्श्वभूमीवर मोदींची स्पष्टोक्ती महत्त्वपूर्ण मानली जात आहे़

भारतीय रेल्वेतील पायाभूत सुधारणांसाठी विदेशी व खासगी गुंतवणुकीमुळे काळजी करण्याचे कारण नाही़ यामुळे केवळ देशाच्या अर्थव्यवस्थेला गती मिळणार आहे़ रेल्वेचे खासगीकरण केले जाईल, ही धारणा चुकीची आहे़ सरकारचे असे कोणतेही प्रयत्न नाहीत़ रेल्वे खासगीकरणाच्या दिशेने कुठलेही प्रयत्न चाललेले नाहीत, अशी कुठलीही आमची इच्छा नाही आणि तसे आमचे धोरणही नाही़ त्यामुळे रेल्वे युनियननी चिंता करण्याची गरज नाही, असे मोदी म्हणाले़.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.