'राहुल गांधी बँकॉकमध्ये नाही उत्तराखंडात', काँग्रेस नेत्याचा दावा

संसदेचं बजेट सुरू होण्यापूर्वीच काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी अचानक सुट्टीवर जाण्याच्या प्रश्नानं अनेक चर्चांना उधाण आलं. इतर पक्ष नाही तर काँग्रेस पक्षामध्येही चर्चा सुरू झाल्या. मात्र आता काँग्रेस नेते जगदीश शर्मा यांनी राहुल गांधी उत्तराखंडमध्ये असल्याचा दावा केलाय.  

Updated: Feb 25, 2015, 08:26 PM IST
'राहुल गांधी बँकॉकमध्ये नाही उत्तराखंडात', काँग्रेस नेत्याचा दावा title=

नवी दिल्ली: संसदेचं बजेट सुरू होण्यापूर्वीच काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी अचानक सुट्टीवर जाण्याच्या प्रश्नानं अनेक चर्चांना उधाण आलं. इतर पक्ष नाही तर काँग्रेस पक्षामध्येही चर्चा सुरू झाल्या. मात्र आता काँग्रेस नेते जगदीश शर्मा यांनी राहुल गांधी उत्तराखंडमध्ये असल्याचा दावा केलाय. जगदीश शर्मा यांनी ट्विटरवर काही फोटो शेअर केलेत. तर काँग्रेसनं जगदीश शर्मा यांचा दावा नाकारत राहुल परदेशातच असल्याचं म्हटलंय.

pic.twitter.com/lJOyu329X1

— jagdishkumarsharma (@jagdishkumarsh4) February 24, 2015

Rahul gandhi ji utrakhnd ke phado me h or hmesa jate h bankak nhi

— jagdishkumarsharma (@jagdishkumarsh4) February 24, 2015

जगदीश यांनी ट्विटरवर एकूण तीन फोटो पोस्ट केलेत. यात राहुल उत्तराखंडमध्ये कँप करत आहेत. यातील एका फोटोत राहुल टोपी घालून आहे. राहुल सुट्टीसाठी बँकॉकला गेले असल्याची बातमी होती. तर राहुलच्या जवळच्या व्यक्तींनी मात्र ते उत्तराखंडमध्ये नसल्याचा दावा केलाय. 

pic.twitter.com/VAQA342CKu

— jagdishkumarsharma (@jagdishkumarsh4) February 24, 2015

काँग्रेसच्या मते हे फोटो खोटे आहेत. जगदीश शर्मा हे काँग्रेसचे नेते असून ते प्रियंका गांधीचे कट्टर समर्थक आहेत. ज्यांनी हे फोटो पोस्ट करून आता नवी चर्चा सुरू करून दिलीय. 

pic.twitter.com/S7vZlVA5ah

— jagdishkumarsharma (@jagdishkumarsh4) February 24, 2015

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.