मुंबई: फेब्रुवारी महिना अर्धा संपलेला आहे, त्यामुळे आता नोकरदार वर्गाला पगारवाढीचे वेध लागले आहेत. या पगारवाढी आधी एऑन हेविट या संस्थेनं कोणत्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना जास्त अपरायजल मिळणार याचा सर्व्हे केला आहे.
या सर्व्हेमध्ये देशभरातल्या 700 कंपन्यांना सामाविष्ट करण्यात आलं होतं. या सर्व्हेनुसार ई-कॉमर्स, लाईफ सायन्स, मीडिया, आयटी, इंजिनिअरिंग आणि ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या कर्माचाऱ्यांना सगळ्यात जास्त पगारवाढ मिळू शकते.
लाईफ सायन्स, मीडिया आणि कन्ज्युमर प्रॉडक्ट्स इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्यांना इतरांपेक्षा जास्त म्हणजेच 15.6 टक्के पगारवाढ मिळू शकते, तर त्याखालोखाल लाईफ सायन्समध्ये काम करणाऱ्यांचा 11.6 टक्क्यांपर्यंत पगार वाढू शकतो, असं या सर्व्हेमध्ये सांगण्यात आलं आहे. तर संपूर्ण भारतामध्ये कर्मचाऱ्यांना सरासरी 10.3 टक्के पगारवाढ मिळण्याचा अंदाजही या सर्व्हेमध्ये करण्यात आला आहे.