www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
आपल्या पतीच्या विवाहबाह्य संबंधांमुळे गेले दोन दिवस चर्चेत असणाऱ्या सुनंदा पुष्कर यांचा मृतदेह हाती सापडला आहे. दिल्लीतील लीला हॉटेलमधल्या रुम नं. ३४५ मध्ये सुनंदा पुष्कर यांचा मृतदेह सापडला. केंद्रीय मंत्री शशी थरुर यांच्या त्या पत्नी होत्या.
पाहुयात काय होती सुनंदा पुष्कर यांची ओळख
> सुनंदा पुष्कर या काश्मीर खोऱ्यातील सोपोरस्थित एका आर्मी अधिकाऱ्याची मुलगी... लेफ्टनंट कर्नल पी. एन. दास हे त्यांचे वडील १९८३ साली सेवेतून निवृत्त झाले. सुनंदा यांनी आपलं शिक्षण श्रीनगरच्या ‘गव्हर्नमेंट कॉलेज फॉर वुमन’मधून पूर्ण केलं.
> सुनंदा पुष्कर या केंद्रीय मंत्री शशी थरुर यांच्या पत्नी होत्या. शशी थरुर हे सुनंदा पुष्कर यांचे तिसरे पती होते. २०१० साली हे दोघे विवाहबंधनात अडकले होते. दोघांचंही हे तिसरं लग्न होतं.
> शशी थरुर यांच्याशी संपर्कात आल्यानंतर सुनंदा पुष्कर यांची 'आयपीएल'च्या कोच्ची टीममध्ये भागीदारी जाहीर झाली होती. सुनंदा यांच्याकडे या भागीदारीसाठी ७० करोड रुपये आले कुठून? असा सवाल उपस्थित करण्यात आला होता. यावेळी, सुनंदा आणि शशी थरुर यांच्या संबंधांची चर्चा सार्वजनिक झाली. त्यानंतर शशी थरुर यांनी सुनंदा यांच्याशी आपले संबंध असल्याची कबुली दिली होती. या वादामुळेच शशी थरुर यांना आपल्या मंत्रीपदावर पाणी सोडावं लागलं होतं. त्यानंतर २२ ऑगस्ट २०१० रोजी केरळमध्ये ५४ वर्षांचे शशी थरूर आणि ४८ वर्षांच्या सुनंदा पुष्कर यांच्याबरोबर विवाहबंधनात अडकले होते.
> सुनंदा पुष्कर यांचे पहिले पती संजय रैना हे होते....
> रैना यांच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर सुनंदा पुष्कर यांनी दुसरा विवाह केरळस्थित बिझनेसमन सुजिथ मेनन यांच्याशी केला.
> मेनन यांचा १९९७ साली रस्त्यावर झालेल्या अपघातात मृत्यू झाला. मेनन आणि सुनंदा यांना २१ वर्षांचा शिव मेनन हा एक मुलगाही आहे.
LIVE : व्हिडिओ पाहा
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.