नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी हे देशाचे पुढील राष्ट्रपती होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एका बैठकीत स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अडवाणी यांचे नाव पुढे केले आहे.
गेल्या आठ मार्च रोजी सोमनाथ येथे झालेल्या बैठकीत नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि स्वतः अडवाणी उपस्थित होते. त्यावेळी मोदींनी राष्ट्रपती म्हणून अडवाणींचे नाव पुढे केले आहे.
लालकृष्ण अडवाणी यांना राष्ट्रपतीपदाच्या निमित्ताने गुरूदक्षिणा देण्यात येईल असे मोदी म्हणाले आहेत.
यावर्षी जुलैमध्ये राष्ट्रपतीपदाची निवडणूक होत आहे. त्यानिमित्ताने या बातमीला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
१९९० मध्ये अडवाणी यांनी सोमनाथपासून अयोध्या अशी रथ यात्रा केली होती. त्यावेळी मोदी यांना आपला सारथी म्हणून प्रोजेक्ट केले होते.