मुख्यमंत्री हातात लिंबू घेऊन का फिरत होते?

कधी काळी अंधश्रद्धेचा जोरदार विरोध करणारे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मैसूरच्या दौऱ्यात हातात लिंबू घेऊन फिरताना पाहिलं गेलं. 

Updated: Sep 2, 2016, 10:55 PM IST
मुख्यमंत्री हातात लिंबू घेऊन का फिरत होते? title=

बंगळुरू : कधी काळी अंधश्रद्धेचा जोरदार विरोध करणारे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मैसूरच्या दौऱ्यात हातात लिंबू घेऊन फिरताना पाहिलं गेलं. 

मैसूरमध्ये जेव्हा ते मीडियाच्यासमोर आले तेव्हा त्यांना हातातील लिंबूबद्दल अनेक प्रश्न विचारले गेले. तेव्हा मात्र त्यांनी या विषयावर गप्प राहणंच पसंत केलं. 

मुख्यमंत्री अंधश्रद्धेच्या आहारी?

काही ठिकाणी वाईट नजर दूर सारण्यासाठी पूजेनंतर लिंबू दिलं जातं. त्यामुळे, मुख्यमंत्री अंधश्रद्धेच्या आहारी तर गेलेले नाहीत ना? असा प्रश्नही आता उपस्थित केला जातोय. विरोधकांनी यावर चांगलाच निशाणा साधलाय. 

कावळा बसला म्हणून... 

याआधीही जून महिन्यात सिद्धरामय्या चर्चेत आले होते ते त्यांनी बदललेल्या कारमुळे... गाडीच्या बोनेटवर काळा कावळा बसलेला पाहिल्यानंतर सिद्धरामय्या यांनी तत्काळ कार बदलण्याचे आदेश दिल्याचं म्हटलं जातंय. कावळ्यालाही अनिष्टततेचं प्रतिक मानलं जातं. 

मुलाच्या मृत्यूनं अंधश्रद्धेवर विश्वास?

सूत्रांच्या म्हणण्यानुसार, याच वर्षी जुलै महिन्यात सिद्धरामय्या यांच्या मुलाचा - राकेशचा अचानक मृत्यू झाला होता. त्यानंतर सिद्धरामय्या यांचा अंधश्रद्धेवर विश्वास वाढीस लागलाय. 

३९ वर्षीय राकेश युरोप दौऱ्यावर असताना त्यांना अचानक बेल्जियमच्या हॉस्पीटलमध्ये भर्ती करावं लागलं होतं. पेन्क्रियाजसंबंधी आजारामुळे त्यांची प्रकृती ढासळली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला होता.