2019 साठी पंतप्रधानपदी 70 टक्के भारतीयांची मोदींनाच पसंती

2019मध्येही नरेंद्र मोदींनाच पंतप्रधान म्हणून पाहायला 70 टक्के भारतीयांनी पसंती दिली आहे.

Updated: Sep 2, 2016, 08:33 PM IST
2019 साठी पंतप्रधानपदी 70 टक्के भारतीयांची मोदींनाच पसंती title=

नवी दिल्ली : 2019मध्येही नरेंद्र मोदींनाच पंतप्रधान म्हणून पाहायला 70 टक्के भारतीयांनी पसंती दिली आहे. न्यूज अॅप 'इनशॉर्ट्स' आणि मार्केट रिसर्च कंपनी इप्सासनं हा सर्व्हे केला आहे. 

या सर्व्हेमध्ये 63,141 जणांनी या सर्व्हेमध्ये सहभाग घेतला होता. यातल्या 70 टक्के जणांना मोदीच 2019 मध्ये पंतप्रधान हवे आहेत, तर 17 टक्के नागरिकांनी याला विरोध दर्शवला आहे. 13 टक्के नागरिकांनी याबाबत कोणतंही मत दिलेलं नाही. 25 जुलै ते 7 ऑगस्टमध्ये हा सर्व्हे करण्यात आला होता. या सर्व्हेमध्ये सहभागी झालेल्या 80 टक्के जणांचं वय 35 आणि त्यापेक्षा कमी होतं. 

मागच्या दोन वर्षांमध्ये दलित आणि अल्पसंख्याकांवर अत्याचार वाढल्याचं 33 टक्के नागरिकांना वाटत आहे, तर 46 टक्के नागरिकांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. 21 टक्के नागरिकांनी याबाबत कोणतंही मत व्यक्त केलं नाही. 

सर्व्हेमधल्या 57 टक्के नागरिकांना राज्यांमध्ये दारूबंदी असावी असं वाटत आहे. तर विद्यार्थी संघटनांच्या निवडणुकांना 61 टक्के नागरिकांनी विरोध केला आहे. अशा निवडणुका व्हाव्यात असं 32 टक्के नागरिकांना वाटत आहे. सात टक्के लोकांनी याबाबत कोणतंही मत व्यक्त केलेलं नाही.