गोरखपूर : गोरखपूरमध्ये झालेल्या हायप्रोफाईल हत्याप्रकरणाचा अखेर खुलासा झालाय. पोलिसांच्या तपासादरम्यान पत्नीनेच आपल्या डॉक्टर पती आणि पाच वर्षाच्या मुलाची हत्या केल्याचे समोर आलेय. फेसबुक फ्रेंडच्या मदतीने तिने हे कृत्य केलं.
आरोपी युवक आणि महिलेचा फेसबुक फ्रेंड अजय यादव शिकोहाबाद येथील रहिवासी आहे. तो सरकारी ज्युनियर शाळेत शिक्षक होता. आठ महिन्यांपूर्वी त्याची आरोपी महिलेशी ओळख झाली. ही ओळख अधिक वाढत गेली. यादरम्यान दोघांमध्ये शारीरिक संबंधही निर्माण झाले.
२० जानेवारी रोजी आरोपी अजय अवध एक्सप्रेसने गोरखपूर येथे पोहोचला आणि आरोपी महिलेच्या घरी आला. पती आणि मुलगा झोपल्याचे पाहून आरोपी अजय यादव आणि महिलेने मिळून हातोड्याच्या सहाय्याने त्यांची हत्या केली.