नवी दिल्ली : पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी जीएसटीसाठीचं घटनादुरुस्ती विधेयक पास करण्यासाठी सरकारनं आता कंबर कसली आहे.
केंद्रीय कॅबिनेटच्या संसदीय कार्य समितीची पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे. यात सरकारचे ज्येष्ठ मंत्री उपस्थित राहतील. त्यानंतर संसदीय कार्यमंत्री व्यंकय्या नायडू यांनी एनडीएच्या खासदारांची बैठक बोलावलीय आहे.
जीएसटी विधेयक मंजूर करण्यासाठी राज्यसभेत दोन तृतीअंश बहुमताची गरज आहे. काँग्रेस आणि युपीएचे घटक पक्ष कुठल्याही परिस्थिती सभागृहात चर्चा करण्यास तयार नाही. त्यामुळे सरकार या तिढ्यातून नेमका कसा मार्ग काढतंय याकडे सर्वाचं लक्ष आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.