'मन की बात': माझं सरकार 'वन रँक वन पेंशन' आणणारच - मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपला रेडिओ कार्यक्रम 'मन की बात'द्वारे देशातील जनतेला मार्गदर्शन केलं. केंद्र सरकार गरीबांच्या विकासासाठी कार्यरत असून गेल्या वर्षभरात सरकारनं तीन महत्त्वपूर्ण योजना राबवल्या आहेत, असं मोदींनी सांगितलं. सैन्यातील जवानांसाठी 'वन रँक वन पेंशन' या योजनेची लवकरच अंमलबजावणी करु असं आश्वासनही त्यांनी या प्रसंगी दिलंय. 

Updated: May 31, 2015, 04:53 PM IST
 'मन की बात': माझं सरकार 'वन रँक वन पेंशन' आणणारच - मोदी title=

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपला रेडिओ कार्यक्रम 'मन की बात'द्वारे देशातील जनतेला मार्गदर्शन केलं. केंद्र सरकार गरीबांच्या विकासासाठी कार्यरत असून गेल्या वर्षभरात सरकारनं तीन महत्त्वपूर्ण योजना राबवल्या आहेत, असं मोदींनी सांगितलं. सैन्यातील जवानांसाठी 'वन रँक वन पेंशन' या योजनेची लवकरच अंमलबजावणी करु असं आश्वासनही त्यांनी या प्रसंगी दिलंय. 

'मन की बात'ची सुरूवात करतांना पंतप्रधानांनी परीक्षेत अनु्त्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी निराश होऊ नये, अपयशातही यशाची एक संधी असते असं म्हटलं आहे. देशाचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनादेखील वैमानिक व्हायचं होतं, यात ते अपयशी ठरले होते, पण आज त्यांच्या या अपयशानंही त्यांना वैज्ञानिक होण्याची संधी दिली अशी आठवणही मोदींनी करुन दिली आहे. 

रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमाद्वारे देशवासीयांशी संवाद साधला. देशभरात उष्णतेची लाट असून यापासून नागरिकांनी स्वतःचं आणि मुक्या प्राण्यांचं रक्षण करावं, असं आवाहन त्यांनी केलं. सीबीएसई बोर्डात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन करत मोदी म्हणाले, पालक, शिक्षक या सर्वांच्या आशा अपेक्षा पूर्ण करत तुम्ही यश मिळवलं. 

मात्र काही विद्यार्थ्यांना अपयशही आलं असेल. अशा विद्यार्थ्यांनी खचू नये आणि अपयशातही नवी संधी असते हे लक्षात ठेवावं. विद्यार्थ्यांचं मनोबल वाढवण्यासाठी मोदींनी माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचं उदाहरण दिलं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.