www.24taas.com, अलाहबाद
2014 च्या पंतप्रधानपदाचे राजकारण आता महाकुंभ मेळ्यात येऊन पोहचलंय. 7 फेब्रुवारीला होणा-या संतांच्या महासंमेलनामध्ये नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
या संमेलनासाठी राजनाथ सिंग आणि सुषमा स्वराज 6 तारखेलाच अलाहाबादला पोहचणार आहेत. भाजपमधील अनेक ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदींनाच पंतप्रधान पदासाठी योग्य नेते असल्याचं मानत असून त्यांनाच अनुमोदन देत आहेत. तरीही एनडीएतील इतर पक्षांचा दबाव आड येण्याची शक्यता आहे.
मात्र तरीही सुषमा स्वराज, राम जेठमलानी, यशवंत सिन्हा अशा अनेक नेत्यांनी मोदींच्या पंतप्रधानपदासाठी हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे मोदींच्याच नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. दरम्यान मोदींसाठी ‘दिल्ली अभी बहूत दूर है’ अशी टिपण्णी काँग्रेसने केली आहे.