भोपाळ : आमिर खानने केलेल्या असहिष्णुतेच्या मुद्द्यावर पती-पत्नीमध्ये झालेल्या वादात पत्नीने विष पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जबलपूरमध्ये घडली आहे.
आमिर खानने केलेल्या वक्तव्यावर मयंक पांडे आणि सोनम पांडे यांच्यामध्ये चर्चा सुरू होती पण चर्चा सुरू असताना मयंक पांडेने आमिर बद्दल काही अपशब्द वापरला आणि आमिरची चाहती असणारी सोनम यांच्यामध्ये वाद झाला.
वाद झाल्यानंतर सोनम तिच्या खोलीत निघून गेली आणि मयंक आपल्या कामात व्यस्त झाला. त्यानंतर अचानक सोनमच्या बंद खोलीतून आवाज येऊ लागल्या त्यानंतर मयंकने दरवाजा खोलून आत गेला तर सोनम उलट्या करतांना त्याला दिसली त्यानंतर त्याने लगेच तिला एका खाजगी रुग्णालयात घेऊन गेला पण काही वेळानंतर सोनमचा मृत्यू झाला.
सोनमच्या भावाने सासरच्या लोकांवर सोनमला हुंड्यासाठी मारल्याचा आरोप केला आहे. सोनमकडून 10 लाख रूपयांची मागणी होत असल्याचा आरोपही त्याने केला आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस अधिक चौकशी करत आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.